History of Track and Filed Event
मैदानी खेळाचा इतिहास: (History of Track and Field) प्राचीन इतिहास: (Ancient History) मैदानी खेळाचा या खेळाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला सुमारे 2800 वर्षापूर्वी च्या प्राचीन ग्रीस देशाचा अभ्यास करण्याची गरज आहे . अथेलेटिक्स म्हणून आपण ज्याला ओळखतो त्यालाच ट्रक आणि फील्ड असेही संबोधले जाते. की ज्या मध्ये धावणे , फेकणे आणि उड्या मारणे याचा समावेश होतो . अथेलेटिक्स हे नाव ग्रीक शब्द ‘Athlon’ या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ स्पर्धा असा होतो. इ. पूर्व 776 मध्ये झालेल्या पहिल्या ऑलिंपिक मध्ये पायाच्या शर्यतीचा समावेश केला गेला होता. ओलिम्पियामधील धार्मिक सणांमुळे तेथील धावपटूंना आधुनिक ट्रॅकच्या अर्ध्या भागावर धावण्याची संधी मिळत असे. मैदाना वरील या शर्यतीच्या धावण्या च्या खेळपट्टीचा भाग हा वक्राऐवजी सरळ असायचा आणि त्याला स्टडीओन असे म्हटले जायचे आणि त्यामुळेच आज क्रीडा क्षेत्रामध्ये स्टेडियम हा शब्द रूढ झाल्याचे दिसून येते . प्राचीन काळी दोन देश किवा प्रदेशामध्ये ...