History of Track and Filed Event
मैदानी खेळाचा इतिहास: (History of Track and Field)
प्राचीन इतिहास: (Ancient History)
मैदानी खेळाचा
या खेळाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला
सुमारे 2800 वर्षापूर्वीच्या प्राचीन
ग्रीस देशाचा अभ्यास करण्याची गरज आहे.
अथेलेटिक्स म्हणून आपण ज्याला ओळखतो त्यालाच ट्रक आणि फील्ड असेही संबोधले जाते.
की ज्यामध्ये धावणे, फेकणे
आणि उड्या
मारणे याचा समावेश होतो. अथेलेटिक्स हे नाव ग्रीक शब्द ‘Athlon’
या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ स्पर्धा असा होतो. इ. पूर्व 776
मध्ये झालेल्या पहिल्या ऑलिंपिक मध्ये
पायाच्या शर्यतीचा समावेश केला गेला होता. ओलिम्पियामधील धार्मिक सणांमुळे तेथील
धावपटूंना आधुनिक ट्रॅकच्या अर्ध्या भागावर
धावण्याची संधी मिळत असे. मैदानावरील
या शर्यतीच्या धावण्याच्या खेळपट्टीचा
भाग हा वक्राऐवजी सरळ असायचा आणि त्याला स्टडीओन असे म्हटले
जायचे
आणि त्यामुळेच आज क्रीडा क्षेत्रामध्ये स्टेडियम हा शब्द रूढ झाल्याचे
दिसून येते .
प्राचीन
काळी दोन देश किवा प्रदेशामध्ये सातत्याने युद्ध होत
असे त्या युद्धादरम्यान जो
शांतता काळ असायचा तेव्हा खर्या अर्थाने खेळाचा विकास झाला. या शांतता काळामध्ये
आपल्या सैनिकांना कुस्ती,
मुष्टीयुद्ध, धावणे आणि रथांची स्पर्धा याद्वारे प्रशिक्षण दिले
जात होते आणि नंतर त्यांच्यात स्पर्धा घेतली जात असे. सन 1700
पर्यंत ऑलिंपिक खेळांना परवानगी नव्हती. परंतु
धार्मिक सन उत्सवाच्या निमित्ताने सम्राट या खेळाचे आयोजन करीत असे . अशाप्रकारे या
खेळाचा सराव सुरु असला तरी ट्रॅक आणि फील्ड हा खेळ खऱ्या अर्थाने 18
व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झाला .
एकोणीसाव्या शतकातील विकास: (Development
of 19th century)
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मनोरंजनासाठी
भरपूर वेळ मिळत होता. त्याच कालावधीत इंग्लंड सारख्या औधोगिक
राष्ट्रांमध्ये विरंगुळ्यासाठी विविध क्रीडा प्रकारची साधने शोधत होती अशाप्रकारे एकोणीसाव्या
शतकात खेळाचे आणि कामाचे स्वरूप बदलत होते.
खेळ आणि
प्रेक्षक या क्रीडा गटाने ट्रॅक आणि फील्ड अधिक संघटित होताना पाहिले.
विवध
सभा आयोजित करून त्यात विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करून मोठ्या
स्पार्धांबरोबरच ट्रॅक व फील्ड क्रीडा प्रकारांचा समावेश
केला गेला. नियम तयार करण्यासाठी आणि स्पर्धा आयोजित करण्यासाठी औपचारिक गटाची
स्थापना करण्यात आली. शाळांनी खेळ सुरू करावा म्हणून त्यांना कार्यक्रम
देण्यात येऊ लागले. अशा प्रकारे
एकोणीसाव्या
शतकाच्या अखेरीस प्रथम आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्यात
१२ ट्रॅक आणि फील्ड क्रीडा प्राकारांचा समावेश करण्यात आला.
आधुनिक ट्रॅक आणि फील्ड: (Modern
Track and Field)
१९ व्या शतकात युरोपमध्ये
आधुनिक
परंपरेसह प्राचीन काळातील ही परंपरा पुन्हा सुरू झाली. आणि याचे श्रेय फ्रांसचे
पियरे द कुबर्टिन यांना जाते. या स्पर्धा आयोजित करण्यामागे
त्यांचे दोन उद्देश होते. १. आपल्या देशात क्रीडा संस्कृती
सुरू
करणे आणि २. या स्पर्धांच्या माध्यमातून
दोन देश किवा प्रदेशामध्ये चालू असलेले युद्ध
थांबवून शांततेसाठी सर्व देशांना एकत्र करणे होय. कुबर्टिन यांच्या कल्पनेच्या
आधारावर सन १८९६ मध्ये ग्रीसची राजधानी
अथेन्स या ठिकाणी पहिल्या आधुनिक
ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धा अथेन्स शहरातील ऑलिंपिया या पर्वतावर
घेण्यात आल्याने या स्पर्धेला ऑलिंपिक असे नाव पडले. अमेरिकेचे माजी
राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ केनेडी यांच्या
मते “ कोणत्याही देशाची प्रतिष्ठा
ठरवायची असेल तर ती अंतरीक्ष यान आणि ऑलिंपिक मधील सुवर्ण पदक यावरून ठरवावे”. या दोन
कारणामुळे क्रीडा क्षेत्रात उत्क्रांती झाली. सन
2008 पर्यन्त ऑलिंपिक ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांची संख्या 12
वरून 47 क्रीडा प्रकारापर्यंत
वाढविली गेली.
प्रथम, यामध्ये
बर्याच क्रीडा प्रकारांचा समावेश केला गेला त्यात रिले, भालाफेक,
आणि क्रॉसकंट्री यांचा समावेश होतो.
एकत्रित क्रीडा प्रकारामध्ये डिकॅथलॉन (10
क्रीडा प्रकार) आणि पेन्टॅथलॉन (5
क्रीडा प्रकार) यांचा समावेश केला गेला. काही क्रीडा प्रकार बंद करण्यात आले होते
परंतु त्यापेक्षा जास्त क्रीडा प्रकार समाविष्ट केले गेले.
दुसरे कारण म्हणजे, सन 1982
पर्यंत महिलांना ऑलिंपिक ट्रॅक आणि फील्ड मध्ये समावेश करण्यास परवानगी नव्हती.
परंतु सन 1982 मध्ये झालेल्या
प्रथम
ऑलिंपिक ट्रॅक आणि फील्ड या क्रीडा प्रकारामध्ये महिलांचा समावेश केला गेला. काही
अपवाद वगळता बहुतेक क्रीडा प्रकार हे महिला आणि पुरुष यांचे समान आहेत. एकत्रित कार्यक्रमा
मध्ये हेपटॅथलॉन (एकूण 7 क्रीडा
प्रकार) यांचा समावेश केला गेला.
ऑलिंपिक मध्ये भारत: (India
in Olympic)
सन 1920 च्या
ऑलिंपिक मध्ये भारताने आपला संघ पाठविला आणि त्यानंतरच भारतात ऑलिंपिक चळवळ सुरू
झाली. सन 1923 मध्ये तात्पुरती आखिल
भारतीय
ऑलिंपिक समितीची स्थापना केली गेली तर सन 1927
मध्ये आखिल भारतीय ऑलिंपिक समितीचे पुनरागठन
होऊन भारतीय ऑलिंपिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे मुख्य काम देशात खेळ व क्रीडा यांचा विकास करणे. या
स्पर्धेमध्ये आज पर्यंत भारतीय खेळाडू
सहभागी होत आहेत.
Comments
Post a Comment
Thank you so much